Announcement:

Activity Club

An Activity Club is a group that organizes and participates in various recreational, educational, or social activities for its members.

Placeholder Image

Blood Donation Camp

स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दि. २१/३/२०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले. यावेळी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथुन डॉ. रसिका पेंदोर, समाजसेवा अधीक्षक आशिष खडसे, मोहन तळवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांबेरे, विभाग प्रमुख डॉ. विजय नेवे, प्रा. पराग ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण वानखडे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित राऊत, रासेयो स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रविण वानखडे यांनी केले, आशिष खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवुन दिले. डॉ. विजय भांबेरे यांनी उपस्थित सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या व रक्तदान हेच श्रेष्टदान याची महती पटवुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. चिन्मयी तांबुले हिने केले.

सदर रक्तदान शिबिराकरिता महाविद्यालयामधील ७६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. रक्तदान शिबिर यशस्विरित्या पार पाडण्याकरीता रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव पार्लावार व सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी कौतुक केले.

Image 1
Image 2
Image 2

Womens Day Celebration

आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी जगदंबा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे महिला दिन कार्यक्रम आयसीसी समिती अंतर्गत घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नेहा पडवळे आणि डॉ.कविता करोडदेव (बोरकर) उपस्थित होते, प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.जी.नेवे सर,आयसीसी समितीच्या प्रभारी प्रा. एन.के. चौकडे ,प्रा. डी.बी.पोहरे,प्रा.एस.आर.राऊत, प्रा.पी.डी.ठाकरे डॉ.एम.बी.वसू, , प्रा.पी.डी.नखाते आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.माँ सरस्वतीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.जी. नेवे सरांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे भाषण केले. डॉ. नेहा पडवळे यांनी आपले भाषण "रागाच्या समस्येचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी" याविषयी मार्गदर्शन केले.आणि डॉ.कविता करोडदेव (बोरकर)यांनी विद्यार्थ्यांना "योगाचे महत्त्व, प्रत्येकाच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व, आहार" याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रा.व्ही.एस.गिरी यांनी केले.अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला.

Placeholder Image
Image 1
Image 2
Image 2
Placeholder Image

Code Champ

On 02/03/2024 "Coding Club" of JCOET organized "Code Champ-24" for first to final year students of all branches. The main objective of this event is to enhance the coding skills and build a deeper understanding of complex coding concepts. The program was inaugurated by cutting the ribbon in hand's of principal Dr. V. L. Bhambere in presence of Prof. P . D. Thakare, Prof. S.P. Chinte Coding Club Incharge. Prof. P. H. Rathod, Dr. Sumit Raut,Prof. A. B. Samarth Prof. N.H. Raja. All students enjoyed the competition very much and we hope that they will continue this type of practice of coding and exploring new ideas and solutions every day. Also, we Congratulate the winners and Runner and thank the students for their active involvement in the competition, thereby making it successful. Coding Club Members Mr. Tejas Pillare, Mr. Shashikant Mutkule, Mr. Krishna Pagrut and Shailesh Rathod took efforts for successful organization of this competition.

Floating Button with Hidden Form
ENQUIRY NOW

Enquiry Now

WhatsApp
9850053333
Call Us
9850053333

Chat With Us